NEWS

1) शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मधील बी. ए. भाग १/२/३ व बी. व्होक. भाग १/२/३ तसेच एम. ए. भाग १/२ वर्गातील नियमित आणि रिपिटर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने १७ मे २०२२ ते २१ जून २०२२ या कालावधीत घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेत नापास झालेल्या व परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक कॉलेज वेबसाईट, कॉलेज नोटीस बोर्ड व टेलिग्राम ग्रुपद्वारे आपणास देण्यात येईल. पुरवणी परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरणे आवश्यक आहे. परीक्षा फॉर्म भरण्यासंदर्भात स्वतंत्र सूचना काढण्यात येईल. परीक्षेसंदर्भात काही शंका असल्यास आपल्या दत्तक पालक शिक्षकांशी संपर्क साधावा. तसेच खालील संबंधित हेल्पलाईनवर फोनद्वारे संपर्क साधावा. १. हेल्प लाईन: 9309959478

2) रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (स्वायत्त) नोटीस: परीक्षा कक्ष परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत वाढ बी.ए. भाग /बी. व्होक. भाग १/२/३ आणि एम. ए. भाग १/२ मार्च/ एप्रिल २०२२ परीक्षेसाठी - परीक्षा फॉर्म भरणे बाबत ================================================ Ref. CSCS/Exam./2021-22/32 दि. ११/०५/२०२२ सिनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये बी.ए../बी.व्होक. भाग १/२/३/ आणि एम.ए. भाग १/२ मध्ये नियमित प्रवेश घेतलेल्या व रिपिटर सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, जे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरण्याचे राहिलेले आहेत त्यांनी दि. १२/०५/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत परीक्षा फॉर्म भरावा. सदर परीक्षा फॉर्म भरण्याची मुदतवाढ अंतिम असून तदनंतर मुदतवाढ देता येणार नाही. त्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास आपण स्वतः जबाबदार असाल याची संबधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना परीक्षा फी भरलेली नाही, तसेच रिपिटर विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरते वेळी नियमानुसार फी भरणें आवश्यक आहे. आपल्या युजरनेम व पासवर्डचा उपयोग करून https://csc.rayaterp.in या लिंकवरून ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरून परीक्षा विभागातून तपासून घेवून कार्यालयात जमा करावा. काही अडचण आल्यास फोनद्वारे ९३०९९५९४७८ या क्रमाकावर संपर्क साधावा. परीक्षा फॉर्म भरतेवेळी प्रवेश पावती बरोबर आणावी. परीक्षा फॉर्म भरल्याशिवाय परीक्षेस बसता येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.  ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची सुविधा २४ तास सुरु असेल.  अंतिम परीक्षा गुणपत्रकाची सत्य प्रत परीक्षा फॉर्म सोबत जोडावी.  रिपिटर बी.ए. व बी.व्होक. साठी ज्या विद्यार्थ्यांचे तीन विषयापर्यंत विषय राहिले असतील त्यांना परीक्षा फीच्या ५०% फी व तीनपेक्षा जास्त विषयासाठी संपूर्ण परीक्षा फी भरावी लागेल.  रिपिटर एम. ए. साठी ज्या विद्यार्थ्यांचे दोन विषयापर्यंत विषय राहिले असतील त्यांना परीक्षा फीच्या ५०% फी व दोनपेक्षा जास्त विषयासाठी संपूर्ण परीक्षा फी भरावी लागेल.

3) रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (स्वायत्त) परीक्षा कक्ष ऑफलाईन परीक्षा नोटीस Ref. CSCS/Exam./2021-22/28 दि. ०१/०४/२०२२ शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मधील बी. ए. भाग १/२/३ व बी. व्होक. भाग १/२/३ तसेच एम.ए. भाग १/२ वर्गातील नियमित आणि रिपिटर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा वेळापत्रकानुसार मंगळवार दि.१७/०५/२०२२ पासून सुरू होत असून परीक्षेचे वेळापत्रक कॉलेज वेबसाईट, कॉलेज नोटीस बोर्ड व टेलिग्राम ग्रुपद्वारे आपणास देण्यात आलेले आहे. परीक्षेसंदर्भात काही शंका असल्यास आपल्या दत्तक पालक शिक्षकांशी संपर्क साधावा तसेच, खालील संबंधित हेल्पलाईनवर फोनद्वारे संपर्क साधावा. १. हेल्प लाईन: 9309959478

4) २०२१-२२ या वर्षामध्ये बी. ए. भाग १ या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी खालील लिंकद्वारे *टेलिग्राम ग्रुपला* जॉईन व्हावे. कोरोना महामारीमुळे होणारे online तास, विविध सूचना, वेळापत्रक इत्यादी कारणासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या ग्रुपला जॉईन होणे अनिवार्य आहे. अन्यथा आपणापर्यंत योग्य ती माहिती पोहचणार नाही. https://t.me/joinchat/2KVKDWWAv5I5Nzk1